चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

खा सुनिल गायकवाड यांनी केली गंगापूर, हरंगुळ येथे वचनपूर्ती !

Source: Tarun Bharat Solapur      Date: 22 Jul 2015 01:47:10

लातूर : खासदार सुनिल गायकवाड यानी लोकसभा निवडणुकीत गंगापूरकरांना दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. लातूर तालुक्यांतील गंगापूर व हरंगुळ बु येथे पाणी टंचाई होती. या ठिकाणी दोन्ही गावात बोअर पाडून मोटर बसवून देतो असे वचन दिले होते. दोन्ही गावात पाच बोअर दिले व मोटारी पंप साहित्य बसवण्यासाठी निधी दिला. याचा लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार सुनिल गायकवाड व त्यांचे वडील बळीरामजी गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पंप सुरु करण्यात आले. या ठिकाणी बाबू खंदाडे यांनी यासाठी प्रयत्न केले, असा उल्लेख खासदार सुनिल गायकवाड यांनी केला. भविष्यात आणखी मदत करु असे आश्वासन त्यांनी दिले. प्राथमिक फेरीत दहा गावात बोअर दिले असून आणखी पाणी टंचाईग्रस्त गावात बोअर देणार असल्याचे जाहिर केले. पाखरसांगवी येथेही बोअर घेण्यात आल्याची माहिती बाबुराव खंदाडे यांनी दिली.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.