चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

कॉपीमुक्त परीक्षेसाठी कडक कारवाईचे धोरण ! – जिल्हाधिकारी सुरेश काकाणी

Source: Tarun Bharat Solapur      Date: 22 Jul 2015 01:44:42

नांदेड : जुलै-ऑगस्ट मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत फेरपरीक्षेच्या अनुषंगाने कॉपीमुक्त वातावरणासाठी कडक कारवाईचे धोरण ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथे दिले. माध्यमिक शालांत परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट २०१५ दरम्यान होणार आहेत, त्यासाठी आयोजित दक्षता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील वीस केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. त्यामध्ये २३ जुलै रोजी इंग्रजी आणि २४ व २५ जुलै रोजी गणित विषयांची परीक्षा होणार आहे. या विषयांसाठीच सर्वाधिक परीक्षार्थींची नोंदणी केली गेली आहे. यावर जिल्हाधिकारी काकाणी यांनी या तीन दिवसांसाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश विभागीय मंडळ, शिक्षण विभाग आणि पोलीस या यंत्रणांना दिले. त्यानुसार बैठेपथक, भरारी पथक तसेच उत्तरपत्रिका तपासणी केंद्र या ठिकाणी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात या परीक्षा दरम्यान कॉपी होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणेला कारवाईबाबत सतर्क करण्यात यावे. गैरप्रकारांवर करावयाच्या कारवाईबाबत पोलीस यंत्रणेला संबंधित तरतूदी कळवण्यात यावेत. जिल्हास्तरावरही तीन विशेष भरारी पथकांची स्थापना करून कोणताही गैरप्रकार होऊ नये, कॉपीमुक्त वातावरण रहावे यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी काकाणी यांनी दिले.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.