चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

तुरीला मिळाला सर्वोच्च भाव !

Source: Tarun Bharat Solapur      Date: 05 Jun 2015 02:19:08


लातूर : लातूरात तुरीला ऐतिहासिक भाव आला आहे. मे महिन्याच्या पाच तारखेला या डाळीने ७९१२ रुपयांचा भाव घेतला. हा भाव लातूरच्या इतिहासातला सर्वाधिक भाव आहे. मागच्या हंगामात कमी झालेला पाऊस, बदललेले वातावरण यामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले. मागणी वाढली आणि आवक कमी झाली. परिणामी तुरीचा भाव चढताच राहिला. या तुरीनं मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आपल्या वाढत्या भावाचे रंग दाखवण्यास सुरुवात केली. २ मेला ७४९० रुपये तर ५ मेला ७९१२ रुपयांचा विक्रमी भाव मिळवला. पुढे कमी अधिक होत ३० मेला ७८०० रुपयांचा भाव तुरीने निश्चित केला. आज या तुरीने ७८५१ रुपयांवर मजल मारली. दैनंदिन जीवनातील तूर हा महत्वाचा गटक असल्याने मागणी अधिक आहे, पण तसा पुरवठा होत नाही. कर्नाटक, आंध्र अणि मराठवड्यातून तूर लातूरच्या बाजारात येते, तरीही लातूरच्या मार्केट यार्डात ५०० ते १००० किंटलपेक्षा अधिक आवक नाही अशी माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली. मागे सोयाबीनचा बोलबाला होता तेव्हा सोयाबीनने ५५०० रुपयांचा भाव गाठला होता. आज तूर त्याच्याही पुढे गेली आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.