चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

ज्येष्ठ सामाजिक विचारवंत हनुमंत उपरे कालवश !

Source: Tarun Bharat Solapur      Date: 20 Mar 2015 01:12:31

बीड : ओबीसी चळवळीचे प्रवर्तक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, साहित्यिक, गणराज बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत उपरे (६२ वर्षे) यांचे आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे. उपरे यांच्या निधनाने महाराष्ट्रातील ओबीसी चळवळ पोरकी झाली आहे. मृत्यूनंतर त्यांनी स्वत:चे नेत्र, मूत्रपिंड आणि यकृत दान करून समाजसेवेचा वसा जपला आहे. उपरे यांनी लहानपणापासूनच संघर्षमय जीवन जगले. शून्यातून जग निर्माण केले. त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष नेहमीच समाज, उद्योजक आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपरे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघाचे माजी राज्य अध्यक्ष, बहुजन उद्योग-व्यापार महासंघाचे राज्य अध्यक्ष, हिंगुलाबिका गृहनिर्माण संस्था, गणराज नागरी सहकारी बॅंकेचे (बीड) संचालक, मासिक भावसार जागृतीचे संपादक आदी पदे भूषवली होती.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.