चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

बीड जिल्ह्यात १९ गावात टँकरने पाणीपुरवठा

Source: Tarun Bharat Solapur      Date: 20 Dec 2014 21:54:30

बीड़ - बीड जिल्ह्यात अजून उन्हाळासुरू होण्याआधीच पाणीटंचाई तीव्र होत चालली असून प्रशासनाने परिस्थिती पाहून १९ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणात अवघे दोन ते अडीच टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीप्रश्न गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर आढावा बैठका घेवून संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्याची बरीच तयारी केली आहे. सध्या तीन विहिरी आणि दोन बोअरचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यामधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.