चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

राज्यात थंडीची लाट, परभणी सर्वांत कमी तापमान ३९ अंश सेल्सियस !

Source: Tarun Bharat Solapur      Date: 19 Dec 2014 21:43:23

 


परभणी :  नागरिकांना यंदा प्रथमच कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते आहे. मुंबईकरही गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. परभणीमध्ये सर्वात कमी ३.९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. गारठ्याने राज्याच्या अनेक भागात सकाळी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. थंडीपासून वाचण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये पुणे - १०, मुंबई - १६, नाशिक - ६, नागपूर - ६.८, औरंगाबाद - ९.८, धुळे - ७.८, नांदेड - ९.३, बीड - ९, लातूर - १२, उस्मानाबाद - ८.९, परभणी - ३.९, जालना - ११.५, अकोला - ७.५, यवतमाळ - ९.६, चंद्रपूर- १०.२, गोंदिया - ९.८, महाबळेश्वर - ९.५ आणि सातारा ११.९ अंश सेल्सियस असे तापमान नोंदवले आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.