चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

हिंगोली विधानसभेत निवडणुकीच्या दीड लाख लग्नपत्रिका

Source: Tarun Bharat Solapur      Date: 06 Oct 2014 05:06:56


हिंगोली, (जि.प्र.)- मतदानाचा ट्नका वाढविण्यासाठी हिंगोली विधानसभेत तहसील कार्यालय व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जनजागृतीसाठी दीड लाख लग्नपत्रिका वाटण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी दिली. मतदानाचा ट्नका वाढविण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविले जात असुन, शहरी व ग्रामीण भागात अंगणवाडी ताई, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कसच्या मदतीने दीड लाख लग्नपत्रिका वितरित केले जाणार आहेत. मतदार जनजागृतीचा उपक्रम अगळ्या वेगळ्या पध्दतीने राबविला जात असुन, लग्नपत्रिकेवर लग्नाची वेळ म्हणजे मतदानाची वेळ टाकण्यात आली असुन, वर म्हणजे मतदार व वधु म्हणजे लोकशाही असा मजकुर टाकला असुन, कृपया आहेर स्विकारू नये हे देखिल अवर्जुन टाकले आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.