चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

आता रंगणार आरोप-प्रत्यारोप

Source: Tarun Bharat Solapur      Date: 06 Oct 2014 05:14:10

वसमतमध्ये आज शरद पवार, बाळापूरात खा.विनायक राऊत तर औंढ्यात महादेव जानकर यांची सभा
हिंगोली, (जि.प्र.)- विधानसभेच्या आखाड्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असुन, आता आरोप-प्रत्यारोपाच्या ङ्खैरी सुरु होणार आहेत. वसमत व कळमनुरी विधानसभेत उद्यापासुन प्रचार सभांचा धडाका सुरु होणार आहे.वसमत विधानसभेत उद्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची जाहिर सभा आयोजीत करण्यात आली असुन, आघाडीत बिघाडी झाल्यानंतर शरद पवारांची पहिलीच सभा वसमतमध्ये होणार आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी दांडेगावकरांना कॅबिनेट देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू निवडूण आल्यानंतर कॅबिनेट तर सोडा राज्यमंत्रीपद देखील दिले नव्हते. एैन लोकसभेच्या तोंडावर त्यांना पंचायत राज समितीचा दिवा दिला. परंतू यामुळे दांडेगावकरांचीच मागील मंत्रीपदाच्या काळातील विकास कामे दुसर्‍या आमदारकीच्या विनींगमध्ये पुर्ण झाली नसल्याने त्यांच्या विरोधात जनमत निर्माण झाले आहे. आता तर राष्ट्रवादीचाच धनाध्य नेता दांडेगावकरांच्या निेवडणुक लढवत असल्याने या निवडणुकीत त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. उद्या वसमतच्या सभेत शरद पवार कोणते आश्‍वासन देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कळमनुरी विधानसभेत उद्या आखाडा बाळापूर येथे शिवसेनेचे उपनेते सिनेअभिनेते अमोल पोले यांची जाहिर सभा होणार असुन, या जाहिर सभेस शिवसेनेचे नेते खा.विनायक राऊत, संपर्कप्रमुख बबन थोरात, जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, सहसंपर्कप्रमुख दिलीप तांभोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कळमनुरी विधानसभेत रासपचे उमेदवार माधवराव नाईक यांच्या प्रचारार्थ औंढा शहरात महादेव जानकर यांची जाहिर सभा आयोजीत करण्यात आली आहे. या जाहिर सभेस भाजपा नेत्या पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. कळमनुरी विधानसभेत एकेकाळच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, भाजपाच्या वतीने वेगवेगळे उमेदवार उभे असल्याने दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या जाहिर सभा होणार आहे. जिल्ह्यातील दोन विधानसभेत उद्या आरोप प्रत्यारोपाच्या ङ्खैरी झडणार असुन, आता प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.