चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

मतदारांना पैसे वाटणार्‍यांवर कडक कारवाई करणार-जिल्हाधिकारी सिंह

Source: Tarun Bharat Solapur      Date: 05 Oct 2014 03:12:33

परभणी,(प्रतिनिधी)- मतदानासाठी मतदारांना कोणत्याही स्वरुपाचे आमिष दाखविणे हा गुन्हा असून आमिष स्वीकारणारासुध्दा तेवढाच दोषी ठरतो. अशी प्रकरणे आढळून आल्यास संबंधिताविरुध त्वरीत गुन्हे दाखल करण्यात येतील. मतदारांना पैसे वाटणा-यांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी गंगाखेड येथे दिला.गंगाखेड येथे तहसिल कार्यालयात गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निवडणूकीतील राजकीय पक्षांच्या तसेच अन्य उमेदवारांसाठीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिस अधिक्षक अनंत रोकडे, निवडणूक निर्णय अधिकारी एस.एच.मावची, तहसिलदार पांडुरंग माचेवाड, किरण अंबेकर, अविनाश शिंगटे, खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी अभय चौधरी हे उपस्थित होते.यावेळी विधानसभा निवडणूक २०१४ साठीच्या उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाबाबत तसेच हिशेब विहित नमुन्यात सादर करण्याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी एस पी सिंह म्हणाले, विधानसभा निवडणुक निर्भय व निष्पक्ष वातावारणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून निवडणुकींचे काटेकोरपणे संनियंत्रण करण्यावर भर देण्यात येत असून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता उमेदवारांनीही घेणे आवश्यक आहे.धार्मिक ठिकाणी उमेदवारांना कोणत्याही पद्धतीने प्रचार करता येणार नाही. जातीय तेढ पसरविणारी भाषणे करणा-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. उमेदवारांच्या खर्चावर खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर असून उमेदवारांनी खर्चाचे हिशेब विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. अवैध दारूविक्री तसेच मोठ्या रक्कमांच्या वाहतुकीवरही करडी नजर ठेवण्यात येत असून, संवेदनशील मतदान केंद्रांच्या गावामध्ये विविध प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे प्रमाण वाढणे गरजेचे असून जिल्ह्यात इपिकची टक्केवारी जेथे जास्त आहे परंतु मतदान कमी झाल्याचे आढळून आले आहे अशा ठिकाणी स्वीप अंतर्गत मतदानाबाबत अधिक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.विधानसभा निवडणूक २०१४ दरम्यान पेड न्यूजला आळा घालण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) चे तसेच उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी खर्च संनियंत्रण कक्षाचे गठन करण्यात आले आहे. पेड न्यूजवर ’एमसीएमसी’ची करडी नजर राहणार असून अशी पेड न्यूज आढळल्यास व समितीद्वारे ती पेडन्यूज असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित उमेदवारास नोटीस बजावण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार टीव्ही अथवा केबल नेटवर्कद्वारे संबंधितांनी जाहिरात दाखविण्यापूर्वी तिचे प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे. या समितीतील केवळ निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेच अशा जाहिराती प्रमाणीत करतील. समितीचा निर्णय हा कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.परंतु च्या निर्णयावर अपील करण्याचा अधिकारही संबंधितांना आहे. त्यानुसार ने प्रमाणीकरणास नाकारलेल्या जाहिरातीबाबत कोणत्याही राजकीय पक्षास अथवा उमेदवारास च्या निर्णयावर राज्यस्तरीय मीडिया प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे अपील करता येऊ शकते.निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा हिशेब सादर करावा. अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.