चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी लाच देणारे व घेणारे शिक्षेस पात्र

Source: Tarun Bharat Solapur      Date: 05 Oct 2014 03:10:02


परभणी,(प्रतिनिधी)- भारतीय दंड विधानाच्या कलम १७१ ब अन्वये निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदाराच्या मतदानावर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने रोख अथवा वस्तुच्या स्वरूपात कोणतीही लाच देत अथवा घेत असलेली कोणतीही व्यक्ती एक वर्ष कारावास वा दंड वा दोन्हीही शिक्षांसाठी पात्र असेल. याशिवाय भारतीय दंडविधानाच्या कलम १७१ क अन्वये मतदार अथवा उमेदवार अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीला शारिरिक अथवा अन्य इजेची धमकी देणारी कोणतीही व्यक्ती एक वर्ष कारावास वा दंड वा दोन्हीही शिक्षांसाठी पात्र असेल. लाच / अमिष देणा-यांवर खटले दाखल करण्यासाठी व मतदारांना धमकी अथवा दहशत दाखविण्या-या व्यक्तीविरूध्द कार्यवाही करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी अशी कोणतीही लाच स्विकारण्यापासुन परावृत्त व्हावे व जर कोणी अशी लाच / अमिष देत असेल वा धमकी किंवा दहशत निर्माण करत असेल व अशा बाबीची कोणाला माहिती असेल तर त्यांनी जिंतुर (९५)- ०२४५७-२२०००८, परभणी (९६)- ०२४५२-२२३०३३, गंगाखेड (९७)- ०२४५३-२२११००, पाथरी (९८) - ०२४५१-२५६१००, अथवा परभणी - ०२४५२-२२४२०० या क्रमांकावर जिल्हा तक्रार निवारण कक्षाला माहिती द्यावी असे जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.