चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

कळमनुरी विधानसभेत खरी लढत राकॉं आणि शिवसेनेतच

Source: Tarun Bharat Solapur      Date: 05 Oct 2014 02:55:27

कळमनुरी- विधानसभा क्षेत्रात एक डझन उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिवाजी माने आणी शिवसेनेचे गजानन घुगे यांच्यातच होणार आहे. कॉग्रेसचा उमेदवार नवखा असुन मतदार संघातील चिरपरिचीत चेहरा नाही तर रासपेचे उमेदवार सततच्या संत्तातरानंतर केवळ उमेदवारीसाठी पक्षात आलेले आहेत. यामुळे दोन्ही उमेदवार मतपेटी आपला प्रभाव दाखवण्यात कमि पडणार असे सध्या मतदार संघात बोलले जात आहे.कॉंग्रेस पक्षाने केवळ आदीवासी समाजाचे मतदार जास्त व एक गठ्ठा व्होट बँकचे गणित मांडून संतोष टारङ्खे यांना उमेदवारी दिली मात्र संतोष टारङ्खे यांना उमेदवारी दिली. मात्र इतर समाजातुन कोणी ही ओळखू शकत नाही. मागील ५ वर्षात टारङ्खे यांचा या मतदार संघात कसलाही प्रकारचा संपर्क नाही. कोणत्याही कार्यक्रमात किंवा इतर सामाजीक कार्यक्रमात सहभाग नाही तसेच विकास कामांचाही त्यांना अनुभव नाही. छोट्या, मोठ्या कार्यकर्त्यांचे कधी दर्शन घेतले नाही. त्यामुळे संतोष टारङ्खे यांना हि निवडणुक ङ्खारच जड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या कॉंग्रेस पक्षातर्ङ्खे ते निवडणुक लढवित आहेत त्याच कॉंग्रेस पक्षाच्या विरुध्द त्यांनी मागील विधानसभा २००९ मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांच्याविरुध्द निवडणुक लढवली होती. तेव्हाच त्यांना परिचय झाला यानंतर या निवडणुकीत कॉंग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली मात्र केवळ एकाच समाजाच्या मतांवर निवडणुुक अवलंबुन नसते हे सर्वांनाच माहित आहे. सेनेचे गजानन घुगे यांची या मतदार संघावर बरीच पकड आहे तसेच ऍड.शिवाजी माने यांच्या मागे मराठा समाजाव्यतीरी्नत मुस्लिम समाजात ही त्यांनी विशेष छाप आहे. राकॉंमध्ये मुस्लिम समाजाला महत्व दिले जाते. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी मुनिर पटेल हे आहेत या व्यतिर्नित तालुकाध्यक्षपदी हुमायुन नाईक हे होते शहराध्यक्षपदी म.खाजा बागवान हे होते, युवक राकॉंच्या जिल्हाध्यक्षपदी नेहाल भैया हे होते अशी महत्वाचीपदे राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाला दिली मात्र त्याउलट कॉंग्रेस पक्षाने केवळ मुस्लिम समाजाला मतदानापुरतेच वापरले अशी चर्चा ठिकठिाणी सध्या रंगत आहे. कॉंगेसचे स्टार प्रचार खा.राजीव सातव यांना सर्वच मतदारक्षेत्रात जाऊन कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे डॉ.टारङ्खे हे कळमनुरी मतदार क्षेत्रात प्रचारामध्ये काय साध्य करु शकतात हे येणाराा काळच ठरवेल. मात्र ऍड.माने व घुगे यांनी सध्या प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. माने हे खासदार राहिलेले आहेत तर गजानन घुुगे यांनी या विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणुन कार्य केलेले आहे. तसेच दोघांकडे मोठा जनसंपर्क व विशेष ओळख असल्याने डॉ.टारङ्खे यांना हि निवडणुक बरीच जड जाणार आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.