चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला कामम ठेवा : ठाकरे

Source: Tarun Bharat Solapur      Date: 03 Oct 2014 08:40:32


परभणी,(प्रतिनिधी)- गेल्मा पंचवीस वर्षापासुन परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असुन हा अबाधित ठेवण्मासाठी सर्व शिवसैनिक प्रमत्न करतील असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मांनी टाळ्मांच्मा गजरात व्मक्त केला.
परभणी शहरातील स्टेडीयममध्ये गंगाखेड, परभणी, पाथरी व जिंतूर येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत मा.ठाकरे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा.संजय जाधव, आ.मिराताई रेंगे, शिवाजी दळणर, डॉ.संजय कच्छवे, राम पाटील, डॉ.राहूल पाटील, रविंद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पूढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना सध्या एकाकी पडली असे लोकांना वाटत असेल. पण तुम्ही जनार्दन माझेसोबत असल्यावर मी कधीच एकाकी पडणार नाही. मी लढणार व मी जिंकणारच आहे. मला मुख्यमंत्री बनविणे कोणाच्या हातात नसुन ते जनतेच्या हातात आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे व परभणी जिल्ह्याचे नाते कधीच तुटणारे नाही. मी आज पंचवीस वर्षाच्या युतीतून मुक्त झालो आहे. येणारे सरकार आपलेच आहे मला सेवक म्हणुन काम करण्याची संधी द्या! असेही ठाकरे म्हणाले. मुंडे-महाजन असते तर युती कदापिही तुटली नसती. मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी शिवसेना व मोदीवर विश्वास ठेवून त्यांना पंतप्रधानपदी बसवले आहे. आता शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नरेंद्र मोदींनी पुढे यावे असे ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर आल्यानंतर जशी माणुसकी दाखवली तशीच माणुसकी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी दाखवावी. मुस्लिम समाजाविषयी बोलतांना ठाकरे म्हणाले की, बांगलादेश व पाकिस्तान धार्जीना मुसलमान आम्हाला नको आहे. सच्चा मुसलमानाने आमच्या सोबत यावे. ओवेसीची मस्ती माझा पक्ष जीरवून दाखवेल. शिवसेना म्हणजे जागेचे गोडाऊन नाही. वाट्टेल त्याला जागा सोडायला. छत्रपती शिवाजी राजे कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत, मी कसा झुकणार म्हणुन ही युती तुटली. भाजपा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएमध्ये आणण्यासाठी इच्छुक होता पण मी व स्व.मुंडेंनी त्याला विरोध केला नाही तर आज शरद पंतप्रधान मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले असते. माझे व स्व.मुंडेंचे नाते घट्ट होते म्हणुन त्यांच्या दोन्ही मुलींसमोर शिवसेनेने उमेदवार दिला नाही. पण मी त्यांना विजयी होण्याचा आशिर्वाद दिला आहे. शेवटी चारही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. शिवसेनेची सत्ता आल्मास विद्यार्थी,शेतकरी मांच्मासाठी विविध मोजना असुन पोलीस खात्माला महसुलाप्रमाणे दर्जा मिळावा मासाठी प्रमत्न करण्मात मेतील. परभणी जिल्ह्यातील गोदावरी खोर्‍माचा विकास निमोजनबद्ध पद्धतीने करण्मात मेईल. त्मानंतरच शेतकर्‍मांच्मा जीवनात खर्‍माअर्थाने क्रांती मेईल. एका बाजुला महाराष्ट्र लुटणारे तर दुसर्‍मा बाजुला तोडणारे मामुळे महाराष्ट्र अबाधित ठेवणार्‍मा शिवसेनेला विजमी करा असे आवाहनही ठाकरे मांनी केले. मावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, डॉ.संदीप कच्छवे, राजू कापसे, संजम गाडगे पाटील,
उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, सखुबाई लटपटे आदी पदाधिकार्‍मांसह कार्मकर्ते व नागरीक मोठ्यासंख्मेने सभेला उपस्थित होते.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.