चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

दसरा महोत्सवाच्या कुस्तीत दिल्लीचा रोहित पटेल अव्वल

Source: Tarun Bharat Solapur      Date: 03 Oct 2014 08:13:11


हिंगोली, (जि.प्र.)- रामलीला मैदानावर आयोजीत दसरा महोत्सवातील कुस्ती स्पर्धेत दिल्लीच्या रोहित पटेलनी मैदान गाजवुन मानाचा फेटा व पारितोषीक मिळवले आहे.
रामलीला मैदानावर एैतिहासिक दसरा महोत्सवातील कुस्ती स्पर्धेत दिल्लीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या रोहित पटेल हा अव्वल ठरला आहे. त्याने गजानन भोयर यास पराभुत केले. दुसर्‍या क्रमांकाचा विजेता कोल्हापूरचा संग्राम पाटील हा ठरला आहे. तर तिसर्‍या क्रमांकाच्या कुस्तीसाठी विजेता शेख नबी हा ठरला आहे. रामलीला मैदानावर कुस्ती स्पर्धेस आज सकाळपासुन प्रारंभ झाला होता. मानाच्या कुस्त्या सायंकाळी ६ वाजता सुरु झाल्या अटीतटीच्या लढतीत दिल्लीच्या रेाहित पटेलनी मैदान गाजवले. या मल्लास अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी फेटा बांधुन पारितोषीक दिले. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलीस उपाधीक्षक सुनिल लांजेवार, पांडूरंग पहेलवान, माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, रामदास घुगे, राजु बांगर, नारायण कदम, नगरसेवक गणेश बांगर, भरत चौधरी, संजु लुंगे, शाम रातनालु, रामराव मुंडे, शांतीलाल जैन, ओमप्रकाश बियाणी, प्रकाश बांगर ,शेख नफीस, गोविंद पहेलवान, जम्मु यादव, रामदास घुगे, नवनाथ कानबाळे आदी उपस्थित होते.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.