चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

मतदार केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम १४४ लागू

Source: Tarun Bharat Solapur      Date: 15 Oct 2014 03:21:19

हिंगोली -जिल्हयातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी हिंगोली जिल्हयाकरिता निवडणूक कालावधी पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी २०० मिटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हा आदेशनिवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवु नये म्हणून दिनांक १४ ऑक्टोबर २०१४ चे सकाळी ६.०० वाजेपासून ते दिनांक १५ ऑक्टोबर चे २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.