चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

जिल्ह्यातील मतदान केंद्रावर राहणार आज कडेकोट पोलीस बंदोबस्त

Source: Tarun Bharat Solapur      Date: 15 Oct 2014 03:39:32


परभणी, (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीचे मतदान दि.१५ ऑक्टोंबर रोजी होणार असुन यासाठी पोलीस अधिक्षक अनंत रोकडे,अप्पर पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन योग्य ती खबरादारी घेत आहे. जिंतूर मतदार संघामध्ये एकुण ३५६ मतदान केंद्र असुन यात ११ संवेदनशील, परभणी मतदार संघात २८७ मतदान केंद्र त्यात २२ संवेदनशील, गंगाखेडमध्ये ३६१ मतदान केंद्र असुन त्यात १२ संवेदनशील, पाथरीत ३४४ मतदान केंद्र असुन यात ९ संवेदनशील असे एकुण १३४८ मतदान केंद्रापैकी ५४ संवेदनशील मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलीस अधिक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलीस अधिकारी लता फड (ग्रामीण), व्ही.एन.जटाळे (पूर्णा), एस.एच.केंगाळ (गंगाखेड), सी.आर.रोडे (सेलू), पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणीचे किशोर काळे, परिक्षाविधीन पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत व लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील दोन पोलीस उपअधिक्षक असे एकुण १० उपविभागीय पोलीस अधिकारी लक्ष ठेवून राहणार आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये परभणी जिल्ह्यातील १८ पोलीस निरीक्षक, १३८ सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहाय्यक उपपोलीसनिरीक्षक, १५२६ पोलीस कर्मचारी, कीक रिस्पॉन्स टीम (१), बॉम्बशोधक नाशक पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील, जिल्हा विशेष शाखेतील साध्या वेषातील बंदोबस्त, रणरागिणी पथक, पोलीस अधिक्षक स्ट्राईकींग फोर्स, अप्पर पोलीस अधिक्षक स्ट्राईकींग फोर्स, पोलीस नियंत्रण कक्ष स्ट्राईकींग फोर्स, पुरुष होमगार्ड (६५०), महिला होमगार्ड (७५), त्याचबरोबर स्थागुशाचे पो.नि.विवेक मुगळीकर, जि.बी.पाटेकर, पोलीस उपनिरीक्षक व्ही.एम.कागने यांचा समावेश राहणार आहे. ह्यामध्ये लातूर प्रशिक्षण केंद्राचे दोन पोलीस उपअधिक्षक, नाशिक पोलीस अकॅडमीचे एक पोलीस उपअधिक्षक, सीआयडी क्राईम पुणे पोलीस निरीक्षक २, नाशिक पोलसी अकॅडमीचे १५ परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यासोबत लातूर पोलीस प्रशिक्षणातील ५० पोलीस कर्मचारी, नागपूर रेल्वे पोलीस ५०, हिंगोली एसआरपीची एक कंपनी, सशस्त्र सेना बल १ (एसएसबी), हैद्राबाद तेलंगणा सीआयएसएफ एक कंपनी, आयआरबी तेलंगना बटालियन १ कंपनी, तेलंगना एसएसएपी रिझर्व्ह पोलीस फोर्स एक कंपनी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने कळविली आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.