चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

विधानसभेच्या प्रचारतोफा थंडावल्या

Source: Tarun Bharat Solapur      Date: 14 Oct 2014 02:33:35

हिंगोली, (जि.प्र.)-माागील आठवडाभरापासुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी विधानसभेच्या आखाड्यात झडत होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांनी जिवाचे रान करत प्रचारात शेवटच्यादिवशीही रॅलीतुन शक्तीप्रदर्शन दाखवले. सायंकाळी मात्र प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता उमेदवारांचा प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात यंदा चौरंगी, पंचरंगी लढतीमुळे, आमदारांचे अस्तीत्व पणाला लागले आहे. आघाडी बिघाडीमुळे व युती दुभंगल्यामुळे चार पक्षात मतविभाजन होत असल्याने यंदाचा निकाल चमत्कारीक लागणारा असुन, प्रत्येक उमेदवाराला आपली ताकद दाखवण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. आठवडाभरापासुन भोंगेबाजी, जाहिरातबाजी, जाहिर सभा करत ग्रामीणभागासह अवघा मतदारसंघ प्रचाराच्या रणधुमाळीने गाजला. तीनही विधानसभा क्षेत्रात प्रचारसभा प्रत्येक पक्षाच्या वतीने घेतल्या गेल्या यात पंतप्रधान मोदी यांची सभा विक्रमी ठरली. या पाठोपाठ माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. विधानसभेच्या आखाड्यात आज प्रचाराची सांगता झाली. प्रचाराची सांगता करतांना प्रत्येक पक्षाच्या वतीने शहरात रॅलीव्दारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दिवसभर भोंगेबाजीला उधाण आले होते. सायंकाळी मात्र भोंगेेबाजी बंद झाली. प्रचाराच्या गाड्यावरील झेंडे, भोंगे उतरवण्यात आले. आता दोन दिवसात निर्णायक प्रचार होणार असुन, ग्रामीण भागात चपतीचे मायाजाल सुरु होणार आहे. उमेदवारांकडून आता गाठीभेटीवर भर दिला जाणार आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.