चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

परभणी जिल्ह्यात ‘पेडन्यूज’संदर्भात १५ उमेदवारांना नोटिसा

Source: Tarun Bharat Solapur      Date: 14 Oct 2014 02:23:40

परभणी,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूक २०१४ दरम्यान ’पेडन्यूज’ला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) चे गठन करण्यात आले. पेड न्यूजवर ’एमसीएमसी’ची करडी नजर असून काही उमेदवारांच्या संदर्भात काही वृत्त जाहिरातसदृष्य असल्याच्या निष्कर्षावर समितीचे एकमत झाले त्यानुसार १२ ऑक्टो २०१४ अखेर ’पेडन्यूज’संदर्भात जिल्ह्यात १५ उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे (एमसीएमसी) अध्यक्ष एस पी सिंह यांनी दिले आहेत. संबंधीत उमेदवारांना २६ नोटीस संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बजावल्या आहेत. १२ ऑक्टो २०१४ अखेर ’पेडन्यूज’संदर्भात जाहिरातसदृष्य ४० बातम्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीस (एमसीएमसी) आढळून आल्या आहेत.९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांना २, कॉग्रेसचे कदम रामप्रसाद यांना १, नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये -परभणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार प्रताप देशमुख यांना ३, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आनंद भरोसे यांना४, शिवसेनेचे उमेदवार डॉ राहुल पाटील यांना ३ , कॉग्रेसचे उमेदवार खान इरङ्गानउर रहेमान खान यांना २, बसपाचे उमेदवार कदम दत्तात्रय यांना १ नोटीस बजावण्यात आली आहे.-गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रासपा,भाजपा, रिपाई, शिवसंग्राम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना २ , मनसेचे उमेदवार बालाजी देसाई यांना १ , राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार मधूसूदन केंद्रे यांना १ नोटीस बजावण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार श्रीकांत भोसले यांना १, अपक्ष उमेदवार युनुस शेख शेख अशरङ्ग अली यांना १, नोटीस बजावण्यात आली आहे. ९८-पाथरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मोहन ङ्गड यांना २, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार अब्दुल्लह खान अ लतीङ्ग खान दुर्रानी यांना १, शिवसेनेच्या मीरा रेंगे यांना १, नोटीस बजावण्यात आली आहे.जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीसमोर (मिडीया सर्टिङ्गीकेशन अन्ड मॉनिटरींग कमिटी) (चउचउ) परभणी जिल्हयातून प्रकाशित होणा-या व वितरित होणा-या वृत्तपत्रांची छाननी करण्यात येत आहे.नोटीस बजावलेल्या उमेदवारांसंदर्भात एकापेक्षा अधिक दैनिकांमध्ये एकाच मजकुराचे, एकच मथळा असलेले असल्याचे तसेच बातमीतील प्रत्येक वाक्य उमेदवाराच्या बाजूने लिहिलेले, निवडणूकविषयक भवितव्य सीमांकीत केलेले, मतदारसंघातील निवडणूक जिंकेल असे नमूद केलेले, उमेदवारांची वारेमाप स्तुती केलेल्या बातम्या असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. ( प्रेस कौन्सिल ऑङ्ग इंडिया (पीसीआय) पत्र क्रमांक १७/१६/१०-११/भावृप/पीसीआय, दिनांक २९-१०-१२) या पार्श्‍वभूमीवर १.३.१ (क) नुसार हे वृत्त जाहिरातसदृष्य असल्याच्या निष्कर्षावर समितीचे एकमत झाले. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे (एमसीएमसी) अध्यक्ष एस पी सिंह यांच्या निर्देशान्वये ५.५.१ नुसार संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना संदर्भीत वृत्त किँवा त्यासमान साहित्य प्रकाशित करण्याकरिता खर्च प्रमाणदरानुसार का परिगणित करण्यात येऊ नये व उमेदवारांच्या खर्चात का मोजण्यात येऊ नये असे नमूद केलेली नोटीस उमेदवाराला देण्यात यावी असे समितीने संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रस्तावीत केले. त्यानुसार संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना नोटीस बजावली आहे. ५.५.२ नुसार नोटीस बजावल्याच्या ४८ तासांच्या आत उमेदवारांकडून समितीला कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही तर अशा बाबतीत समितीचा निर्णय अंतिम असेल.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.