चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

कॉंगे्रस, राकॉं विधानसभेत संपणार : उमा भारती

Source: Tarun Bharat Solapur      Date: 14 Oct 2014 01:36:05


मकरंद बांगर (हिंगोली) - केंद्रात जनतेने भाजपाला एकहाती सत्ता दिली. आता राज्याचा कायापालट घडणार असुन, या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष संपणार आहेत. आज या दोन्ही पक्षाचे नेते डरकाळ्या फोडून धमक्या देत आहेत. या नेत्यांनी धमक्याच द्याययच्या तर देशाच्या दुष्मनांना द्याव्यात असे टीकास्त्र केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी केले.वसमत येथे भाजपाचे उमेदवार शिवाजी जाधव यांच्या प्रचारार्थ ना.उमा भारती यांच्या सभेचे आयेाजन करण्यात आले हेाते. या सभेस भाजपाचे उमेदवार शिवाजी जाधव, उज्वलाताई तांभाळे, शंकरराव खराटे, निरंजन इंगोले, रावसाहेब आडकिणे, डॉ.लिना जाधव, श्रीकांत देशपांडे, मिलींद यंबल, अन्वेकर मामा, शिवदास बोड्डेवार, सुनिल काळे, नंदु मुंदडा यांची उपस्थिती होती. या जाहिर सभेत बोलतांना उमा भारती पुढे म्हणाल्या की, राष्ट्रवादी पक्ष म्हणजे भ्रष्टाचारी हे आता सांगायची गरज नाही. या पक्षाच्या नेत्यांना सत्तेचा उन्माद चढलेला आहे. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता विधानसभेत देखील अशीच अवस्था होणार आहे. कॉंग्रेसला तर लोकसभेत जनतेनी जागा दाखवुन दिली. आता विधानसभेत कॉंग्रेसला कोणी वाचु शकणार नाही. केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमाने राज्यातील विकासाची घडी बसविण्यासाठी मोदी सरकार कटिबध्द असुन, देशातील सरकार आज गरिबांसाठी काम करीत असल्यामुळे देशात गोरगरीब जनतेला अच्छे दिन येणार आहेत. असे सांगत भाजपाला एकहाती सत्ता सोपवा. वसमतचा कायापालट करु वसमतक्षेत्रात विकास कामे कोणती असतात हे दाखवले जातील सिंचनाचे क्षेत्र वाढविले जाईल असे आश्‍वासन त्यांनी दिले. राज्यात गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपाला बहुमत द्या असे आवाहन केले. शिवसेनेचा समाचार घेतांना युती शिवसेनेच्याच भुमिकेमुळे तुटली. बाळासाहेब हे माझ्यापित्यासमान होते. त्यांनी मला नेहमीच आर्शिवाद दिले परंतू आज त्यांचे पूत्र मोदीजींवर टीका करीत आहे. त्यांनी टीका करतांना संयम पाळा मोदीजी शिवसेनेच्या विरोधात बोलत नसतांना असे बेताल वक्तव्य शोभनीय नाही. शिवसेनेला देखील निवडणूकीत आपली जागा दिसेल असा मार्मीक टोला त्यांनी लावला. उमा भारतींच्या नियोजीत सभेची वेळ १२ असली तरी ४ वाजेपर्यंत प्रेक्षकांनी या सभेची प्रतिक्षा केली.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.