चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

परभणी शिवसेनेचा बाल्लेकिल्ला कायम ठेवा-आदित्य ठाकरे

Source: Tarun Bharat Solapur      Date: 12 Oct 2014 02:18:41


परभणी, (प्रतिनिधी)- परभणी हा शिवसेनाचा बाल्लेकिल्ला असून तो शिवसैनिकांनी कायम ठेवावा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जिल्हयातील परभणी, पाथरी, जिंतूर व गंगाखेड मतदार संघातील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ परभणी ते बाजार समिती या मैदानावर आयोजित जाहिर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, डॉ.संजय कछवे, डॉ.राहुल पाटील, मिराताई रेंगे, डॉ.शिवाजी दळणर, राम खराबे पाटील, सखूबाई लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ही निवडणूक म्हणजे स्वाभीमानी महाराष्ट्राची लढाई होय. आठरा वर्ष झाल्यानंतर मतदाराचा ह्नक मिळतो तर आपण २४ वर्षाचे असतांना नेत्यांशी बोलनी करू शकत नाही काय ? मात्र याचा विचारच करण्यात आला नाही. अखेर भाजपने युती तोडली. आणि स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसैनिक ही शिवसेनेची खरी श्‍नती असून या श्‍नतीच्या जोरावरच महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकणारच. जिल्हयातील चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी बोलतांना शिवसेना सचिव आदेश बांदेकर म्हणाले, परभणी म्हणजे शिवसेनेचा श्‍वास होय याची जाण सर्वांनाच आहे. मतदार आणि शिवसैनिकांच्या विश्‍वासावर परभणीचा बालेकिल्ला कायम राहिल, असा ठाम विश्‍वासही त्यांनी व्य्नत केला. खा.संजय जाधव म्हणाले, परभणी आणि शिवसेनेचे नाते एक आगळे-वेगळे आहे. विधानसभेवर भगवा ङ्खडकविण्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करावे. या प्रसंगी डॉ.राहुल पाटील, आ.मिराताई रेंगे आदींचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना, युवासेनाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, नागरीक, युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.