चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

केमिकल्सच्या स्फोटात दोन ठार

Source: Tarun Bharat Solapur      Date: 12 Oct 2014 02:25:34


परभणी, (प्रतिनिधी)- अल्युमिनिअम शिटच्या कारखान्यात काम सुरू असतांना अचानक केमिकल्सचा स्फोट होऊन दोन जण ठार झाल्याची घटना शनिवार सकाळी ममता कॉलनी नजिक उघडा महावेद येथे घडली. मृतात एका आडीच वर्षीय बालीकेचा समावेश आहे. ममता कॉलनी नजिक अल्यूमिनिअमचा कारखाना असून तेथे नियमीतपणे काम चालते. रविवार सकाळी काम सुरू असतांना अचानक कॅमिकल्सचा स्फोट झाला. त्यात शे.शकिल अब्दूल अजीज (३५) आणि अलिया (३) यांचा मृत्यू झाला. केमिकलमुळे त्यांच्या शरिरातील मास बाहेर आले होते. घटना होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. बॉम्ब शोधक पथक, नांदेड येथील ए.टी.एस.चे पथक दाखल झाले.पोलीस अधिक्षक यांच्यासह स्थानीक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, संजय हिवारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी शहरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची अफवा होती मात्र हा स्फोट कॅमिकल्सचा असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक संजय हिवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि.शाळमे, राठोड, कांबळे आदी करत आहेत.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.