चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे भाजपा सरकार येणार!

Source: Tarun Bharat Solapur      Date: 11 Oct 2014 02:22:25


मोदींची ग्वाही; हिंगोलीत विराट जनसमुदायाची उपस्थिती
हिंगोली (मकरंद बांगर)-लोकसभेच्या प्रचारापेक्षाही विधानसभेच्या प्रचाराला विराट जनसमुदाय असल्यामुळे आता कॉंग्रेसला कोणीही वाचू शकणार नाही. महाराष्ट्रात पूर्ण बहुमतात भाजपाचे सरकार येईल. मला महाराष्ट्रातील जनतेचे प्रेम व्याजासह विकास कामानी चुकते करायचे आहे. असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंगोलीत जाहीर सभेत बोलतांना केले. हिंगोली येथील तापडिया इस्टेट मैदानावर विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संघटनमंत्री रेणुकादास देशमुख, माजी खा.सुभाष वानखेडे, हिंगोली विधानसभेचे उमेदवार तानाजी मुटकुळे, वसमतचे शिवाजीराव जाधव, कळमनुरीचे माधवराव नाईक, जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना नरेंद्रभाई मोदी पुढे म्हणाले की, जाहिर सभांना विराट जनसागर उलथत असुन, जिकडे पहावे तिकडे डोकेच दिसत आहे. हि परिवर्तनाची नांदी असुन, महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार आता कॉंग्रेसला कोणी वाचवु शकणार नाही. देशातील जनतेने कॉंग्रेसला काय नाही दिले. परंतू कॉंग्रेसने शेतकर्‍यांना पाणी दिले नाही. शेतकर्‍यांना पाणी दिले तर ते सोने पिकवतील राज्यात धरणे, बांध बनतात मात्र पाणी मिळत नाही. राज्यात काही परिवारांनीच सत्तेची मलाई चाखली मला मजबुत सरकार हवे आहे. मी तुमच्यातीलच आहे. गरीबी काय असते हे जवळुन पाहिल, अनुभवल यामुळे राज्याचे दु:ख दुर करण्यासाठी मी तुमच्यात उभा आहे. तुमचे प्रेम, आशीर्वाद असेच कायम ठेऊन महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यावर या प्रेमालाव्याजासहित विकासकामातुन पुर्ण करणार असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी रोजगारासंदर्भात बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी राज्यात नवनवीन उद्योगधंदे उभारुण तरुणांच्या हाताला काम, रोजगार देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगीतले.

मोदींचा आवाज बसला,पण भाषणाचा जोष कायम
आज आपला आवाज खराब झाला आहे. कालपर्यंत आवाजाची गाडी पटरीवर होती परंतु आज आपल्याला जास्त काळ बोलता येणार नाही, असे सांगून मोदींनी उपस्थितांची माफी मागितली आणि भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. मोदींचा आवाज खराब झाला असला तरी त्यांचा आवेश मात्र जबरदस्त होता. त्यांच्या भाषणाला हिंगोलीकरांनी जोरदार प्रतिसाद दिला.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.