चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

वसमत विधानसभेच्या उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी पूर्ण

Source: Tarun Bharat Solapur      Date: 10 Oct 2014 03:03:57

वसमत, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१४ साठी वसमत विधानसभा मतदार संघातील १२ उमेदवारांची प्रथम खर्च तपासणी दि.७ ऑक्टोबर २०१४ रोजी तहसिल कार्यालय, वसमत येथील सभागृहात मा. खर्च निरिक्षक दर्शन गौडा, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी श्री. सूरेश केंद्रे, निवडणूक निर्णय अधिकारी सौ.अनुराधा ढालकरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अरविंद नरसिकर, सहाय्यक खर्च निरिक्षक मनोज गग्ग्ड , व तसेच श्री. बी.के.तेललवार, इंगोले, नजिबखॉन, नुग्रवार यांच्या उपस्थितीत उमेदवाराच्या खर्चाची प्रथम तपासनी करण्यात आली. खर्च तपासणीसाठी सर्व १२ उमेदवारांनी त्यांचा खर्च व प्रमाणके तसेच बँकेतील केलेला व्यवहार याचे पुरावे व अभिलेखे सादर केले. तपासणी दरम्यान उमेदवारांचा त्यांच्या नामनिर्देशनापासून दिनांक ७ ऑक्टोबर २०१४ पर्यंतचा खर्च तपासण्यात आला व उमेदवाराचा खर्च खालील प्रमाने नोंदविण्यात आला. उमेदवारांचे नाव, पक्ष व झालेला खर्चाची माहिती- १) अ.हाफिज अ.रहेमान, (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस) रु.१,५७,५९३/-, २) खाजा जहॉगिर शेख, (बहुजन समाज पार्टी) , रु. ५६,३९०/-, ३) जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर, (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), रु.२,३७,८११/-, ४) ड.जाधव शिवाजीराव मुंजीजीराव, (भारतीय जनता पार्टी), रु.३,४६,२६०/-, ५) मुंदडा जयप्रकाश शंकरलाल, (शिवसेना) रु. ४,५०,९८१/-, ६) ड. इप्तेखार म.जब्बार शेख, (भारिप बहुजन महासंघ), रु.३५,६०५/-, ७) गिते मिनाक्षी गंगाधर, (बहूजन मुक्ति पार्टी), रु १३,६१७/-, ८) शेख सुभान अली मोहम्म्द अली (वेलङ्खेअर पार्टी ऑङ्ख इंडिया), रु.२१,४४०/-, ९) जाधव शिवाजी लक्ष्म्णराव, (अपक्ष), रु.१४,३००/-, १०) वाघमारे रविकिरण रामराव, (अपक्ष), रु.६,०००/-, ११) सरोदे गोपीनाथ यशवंतराव, (अपक्ष), रु.२९,१६८/-, १२) सुतारे बाबासाहेब शंकर, (अपक्ष), रु.६,०००/-.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.