चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

भाजपाला १५० पेक्षाजास्त जागा मिळतील-मनोहर पर्रीकर

Source: Tarun Bharat Solapur      Date: 10 Oct 2014 02:23:40

परभणी, (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे महत्व जाणल्यामुळेच विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे राज्यात भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळतील असा ठाम विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. परभणी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ व्यापारी, डॉक्टर, वकील यांच्याशी संवाद साधतांना पर्रीकर परभणीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार आनंद भरोसे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे,अभय चाटे, राजेश देशपांडे, मा.आ.विजयराव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर एलबीटी टिकू शकणार नाही असे सांगून पर्रीकर म्हणाले, विकास म्हणजे केवळ रस्ते,पूल बांधणे नसुन सर्व समाज सुखी होणे होय. समाज सुखी करण्यासाठी विविध योजना गोवा राज्यात राबविण्यात आल्या असुन भाजपाची सत्ता आल्यास महाराष्ट्रातही या योजना राबविण्यात येतील. सत्तेची भाकरी फिरविण्याची ही योग्य वेळ आली असुन याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. पर्रीकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेवर आपल्या खास शैलीत टिका केली. प्रारंभी उमेदवार आनंद भरोसे यांनी मतदारसंघातील समस्या मांडतांना विजेचा प्रश्‍न गंभीर असून, अच्छे दिन येण्यासाठी परभणीत कमळ फुलविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आ.विजय गव्हाणे यांचेही भाषण झाले.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.