चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिंगोलीत

Source: Tarun Bharat Solapur      Date: 10 Oct 2014 02:58:34


सभेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात बंदोबस्त

 नमो नमोची लाट अवतरणार
हिंगोली, (जि.प्र.)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि. १० ऑ्नटोबर रोजी हिंगोली दौर्‍यावर येत असुन, पंतप्रधानाच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभुमीवर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. चार जिल्ह्यातील पोलीसांचा बंदोबस्त सभेसाठी असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर हिंगोली, कळमनुरी, वसमत विधानसभेच्या प्रचारार्थ तापडिया इस्टेट मैदानावर दुपारी २ वाजता जाहिर सभा आयोजीत करण्यात आली आहे. या जाहिर सभेस केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा आ.पंकजा मुंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यासंदर्भात दिल्ली येथील विशेष पथकाच्या हेलिकॅप्टर ङ्खेर्‍या दोन दिवसापासुन वाढत आहे. दिल्ली येथील विशेष सुरक्षा पथक, गुप्तचर विभागाचे पथक हिंगोलीत दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या वेळोवेळी तपासण्या करण्यासाठी दिल्ली येथील पथके हेलिकॅप्टर व्दारे हिंगोलीत दाखल होत आहे. दरम्यान आज पोलीस अधीक्षक एन.अंबिका, उपाधीक्षक सुनिल लांजेवार, निलेश मोरे, पीयुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेचा सराव देखील घेण्यात आला. देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच हिंगोलीत येणार असल्याने भाजपात चैतन्य निर्माण झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत सभेच्या तयारी सुरु होती. तापडिया इस्टेट मैदानावर मंडप उभारणीचे काम अंतीम टप्प्यात पोचले असुन, उशिरापर्यंत तयारी सुरु होती. यासभेस तीन्ही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बांधवांनी अधिकाधीक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर व उमेदवार तानाजी मुटकुळे, शिवाजी जाधव, माधवराव नाईक यांनी केले आहे.नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्‍वभुमीवर शहरात चार जिल्ह्यातील पोलीसांचा बंदोबस्त लावण्यात आला असुन, १५ ठिकाणी वाहनांसाठी जागा पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी यांच्या प्रचार सभेसाठी तीन ते चार लाख नागरिकांची उपस्थिती राहिल अशी अपेक्षा भाजपा नेत्यांकडून व्य्नत केली जात आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.