चैत्र शु. ५, १९३९, युगाब्द ५११६, शनिवार, दि. १ एप्रिल २०१७

उमेदवारांच्या गाठीभेटीने प्रचारात आली रंगत

Source: Tarun Bharat Solapur      Date: 10 Oct 2014 03:07:22

हिंगोली, (जि.प्र.)- विधानसभा निवडणुकीत तीन्ही विधानसभेत चौरंगी पंचरंगी लढत होत असल्याने या काट्याच्या लढतीत उमेदवारांच्या गाठीभेटीने विधानसभा क्षेत्र ढवळून निघत आहे. हिंगोली जिल्ह्यात तिनही विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा अशा चौरंगी लढती आहेत. तर मनसे, कम्युनिष्ट, भारिप बहुजन महासंघ, बीएसपीच्या उमेदवारामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मतविभाजनाचा चटका बसणार आहे. तीनही विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रबळ उमेदवार मैदानात असल्याने आघाडीचे मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. परंतू हिंगोलीत शिवसेनेचा उमेदवाराचा प्रभाव कमी असल्याने हिंगोलीत भाजपा ङ्खायद्यात राहणार आहे. तर कळमनुरीमध्ये रासपचा प्रभावी उमेदवार असल्याने शिवसेनेला नुकसान सोसावे लागणार आहे. तर वसमतमध्ये भाजपाचा उमेदवार प्रभावी असुन, शिवसेनेच्या यंत्रणेला देखील या उमेदवाराने सुरुंग लावल्याने याहीठिकाणी शिवसेनेला वजाबाकीच सोसावी लागणार आहे. एकंदरीत विधानसभा निवडणुकीत चार प्रमुख पक्षाबरोबरच मनसे, भारिप बहुजन महासंघ, कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात मत विभाजन करत असल्याने कोण कोनाचे मतविभागतो यावरच जय-पराजय ठरणार आहे.

Advertisement

Copyright © 2014. All Rights Reserved.